जमीनीवर पडलेली फुले देवाला कधीही वाहू नयेत असे म्हणतात मात्र याला अपवाद पारिजाताचे फुल आहे. पारिजात नेहमी रात्री बहरतो व सुर्योदय झाला की ही फुले गळुन जमीनीवर पडतात.
पारिजात वृक्षांची महती पुराणातही ऐकायला मिळते. १० ते १५ फुट वाढणार्या या झाडाला हरसिंगार किंवा शेफाली या नावानेही ओळखले जाते. पारिजातकाच्या कथा पुराणात अशा आहेत .
विष्णू पुराणातील एका कथेत एका पराक्रमी राजाची सुंदर व सुशिल राजकन्या जिचं नाव पारिजात असते, या राजकुमारीच सुर्यदेवावर प्रेम जडते तेव्हा सुर्यदेव तिला म्हणतात की हे राजवैभव सोडून माझ्या बरोबर चल पण राजकुमारीला ते शक्य होत नाही व सुर्यदेव पुढे निघून गेल्यावर ती कोमेजून मृत्यू पावते.
तिच्या भस्मातुन जे झाड उगवते त्याला पारिजात नावाने ओळखले जाऊ लागले
दुसरी एक कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्णांनी हे झाड स्वर्गातुन पृथ्वी वर आणुन पत्नी सत्यभामा च्या दारात लावले हे पाहून रुक्मिणी नाराज झाली व रुसली पण सकाळी उठून पहाते की पारिजातकाचा सडा आपल्या अंगणात पडला आहे हे पाहून तिचा रुसवा संपला व तिचं श्रीकृष्णावरील प्रेम आणखीनच दृढ झाले.
आणखी एक आख्यायिका आहे की हनुमंताने पारिजात वृक्षांच्या छायेत विश्रांती घेतली होती
अशा या पारिजातकाच्या झाडाला निरपेक्ष प्रेमाचे प्रतीक मानले जाते