श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई

मटण दरवाढ कारणीभूत कोण?

मटणाचे भाव गगनाला भिडले, मटण सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर, मटण दरवाढीमुळे कोल्हापूर मध्ये असंतोष अशा बातम्या गेली तीन चार महिने सतत कानावर पडत आहेत हे खरे की भाव चढे आहेत पण या दरवाढीचे खापर मटण विक्रेत्यांवर फोडणे किंवा मटण विक्रेते नफाखोरी करत आहेत असा अपप्रचार जो केला जात आहे तो पुर्णपणे चुकीचा आहे.

महाराष्ट्रात हिंदू खाटिक समाज व मुस्लिम खाटिक समाजाची लोक प्रामुख्याने मटण विक्री चा व्यवसाय करतात या व्यवसायाला लागणारा कच्चा माल म्हणजे बोकड, शेळ्या मेंढ्या व हा माल सर्वत्र उपलब्ध होत नाही. बकर्यांचे बाजार ठराविक ठिकाणीच भरतात. पुर्वि खेड्यात घरगुती पाळलेली बकरी मिळत व अशी मिळालेली बकरी चालत किंवा सायकलवर आणत पण कालांतराने हि बकरी मिळेनाशी झाली व दुकानदारांना बाजारात जाऊन बकरे खरेदी करणे अपरिहार्य झाले परिणामी खर्च वाढला ट्रान्सपोरटेशन वाढले यातच पेट्रोल डिझेलची भाववाढ व त्यामुळे वाढतच जाणारा खर्च परिणामी मटणाचे दर वाढले.

पुर्वी धनगर समाज जो बकर्यांचा मुख्य पुरवठादार होता त्यांची नवी पिढी शिक्षित झाली व त्यांना आरक्षणामुळे नोकरी मिळु लागली म्हणून त्यांनी शहराकडे धाव घेतली परिणामी बकरे पाळणारे धनगर झपाट्याने कमी होत गेले.चुकीचे सरकारी धोरण, नोकरशहांची अनास्था अशा अनेक कारणांमुळे शेळीपालन हा शेतकरयांचा प्रभावी जोडधंदा होऊ शकला नाही या सर्व कारणांमुळे बकर्यांची उपलब्धी कमी होत गेली परिणामी भाववाढीला सुरूवात झाली

यंदा पावसाने झोडपले व त्यामुळे सांगली सातारा कोल्हापूर या भागात पुर परीस्थिती निर्माण झाली याचा सर्वात मोठा फटका जनावरांना बसला हजारो शेळ्या मेंढ्या दगावल्या पुर ओसरल्यावर रोगराईचे थैमान सुरू झाले त्यातच कशाबशा बचावलेल्या जनावरांना चारा मिळेनासा झाला व बाजारात बकर्यांची कमतरता जाणवू लागली परिणामी भाववाढ झाली व खरेदी वाढल्यामुळे मटणाचे भाव वाढणे क्रमप्राप्तच होते हे कमी म्हणून की काय आणखी एक संकट उभे ठाकले ते म्हणजे परराज्यातील व्यापारी महाराष्ट्रातील बाजारात खरेदीसाठी उतरले.

कर्नाटक तामिळनाडू मध्ये मटणाचा दर ६०० ते ७०० रुपये असल्यामुळे तिथले व्यापारी आपल्या व्यापार्यांपेक्षा जास्त भाव देवून माल खरेदी करू लागले शिवाय हे व्यापारी कंटेनर घेऊनच खरेदीला येतात त्या एका कंटेनर मधे ७०० बकरी घेऊन जातात व दर आठवड्याला असे ५ ते १० कंटेनर बकरी परराज्यात नेली जातात म्हणून आधीच महागाईने त्रस्त झालेल्या आपल्या दुकानदारांना भाव वाढवण्याशीवाय पर्यायच राहिला नाही अशी अनेक कारणे असताना मटण दुकानदार नफेखोरी साठी भाव वाढवतात असे म्हणणे चुकीचे ठरेल.

खरं तर खाटिक समाज तुटपुंज्या कमाईवर धंदा करुन एक प्रकारे समाजसेवाच करत आहे. मटण खाताना जरी चवदार लागत असले बकरे कापण्या पासून त्याची साफसफाई करणे व तोडणे हे अतिशय जिकिरीचे व कष्टाचे काम आहे मटण तोडताना खूप मोठी जोखीम असते कित्येक वेळा बोटं तुटतात, जखमा होतात तरीही खाटिक समाज न कुरकुरता हि समाजसेवा करीत आहे.

साधारण विस ते पंचवीस वर्षांपूर्वी १२० रुपये किलो मटणाचा दर होता. परंतु परराज्यातून येणारे लोंढे, वाढती लोकसंख्या व दुसरीकडे शेळी मेंढी चे घटते उत्पादन या सर्व गोष्टी असतानाच गेले काही वर्षे मटण दुकानदारांच्या व्यवसायाला चमड्याच्या भावाचे ग्रहण लागले व धंद्याला उतरती कळा लागली कारण कित्येक दुकानदारांचा धंदाच कातड्याच्या विक्री वर अवलंबून होता दिवसेंदिवस महाग होणारी बकरी खरेदी व मटण विक्री यांचा ताळमेळच बसत नव्हता नफा म्हणुन फक्त चमडे राहिले तरी दुकानदार समाधान मानत होता, कारण साधारण १०० ते २५० कधी कधी ३०० रुपये एका कातड्याचे मिळत पण काही कारणांमुळे चमड्याचा भाव एकदम १० ते २० रु पर्यंत खाली आला व हे चमडे टिकून राहण्यासाठी त्याला मिठ लावावे लागते त्याचा खर्च २० रुपये लागत होता म्हणजे शिल्लक काहीच राहात नव्हते मग मटणाचे भाव वाढवण्याशीवाय पर्यायच नव्हता.

आता भाववाढ म्हणाल तर विस वर्षी पुर्वी सोनं ४००० हजार रुपये तोळा होते ते आज ४०००० च्या वर पोहोचलो आहे १० पट भाववाढ झाली वन बिएचके चार ते पाच लाखात मिळत होता तो आता ऐंशी लाख झाला डिझेल जे २००० साली १० रुपये होते ते आता ७० रू आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दहा ते पंधरा पट महाग झाल्या आहेत मात्र मटण पाचपट महाग झाले तेही २० वर्षीत तर ते महाग कसे म्हणता येईल महागाई २० वर्षीत दहा पट वाढलीच आहे अशी एक ना दोन अनेक कारणे आहेत की ज्यामुळे मटणाचे भाव वाढले या अडचणी कमी पडतात की काय म्हणून कोल्हापूरात अन्न प्रशासन मंडळने दुकानदारांवर कारवाई चालू केली आहे हि कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली व काही दुकाने सिल केली आहे .

मुळात महागाई करणे किंवा ती कमी करणे कोणाच्याही हातात नाही. दरवाढ होण्यामागे जागतिक व भौगोलिक कारणे आहेत खाटिक दुकानदार नाहीत हे समजून घेणे गरजेचे आहे. तरी कृपया मटण विक्री करणाऱ्या खाटीक समाजाच्या भावना समजून घ्या व कसलेही गैरसमज पसरवू नका व शांतीप्रीय असलेल्या आमच्या समाजाला आंदोलने करण्यास भाग पाडू नका ही समाजाच्या वतीने नम्र विनंती.

श्री. अनंत नारायण प्रभाळे

श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई