२०२० साल उजाडताना डोळे किलकिले करीत चिन मधुन उदयास आलेला कोवीड१९ अर्थातच कोरोना वायरस. महीनाभरात चिनची वेस ओलांडून बाहेर पडला आणि बघता बघता सुरू झाला एक वेगळाच जिवघेणा आजाराचा खेळ. जानेवारी फेब्रुवारीमध्ये चिन व जवळपासच्या देशात थैमान घालत असतातच या रोगाच्या विनाशकारी ताकदीची जाणीव व्हायला लागली होती. हे संकट आज ना उद्या आपल्या पर्यंत पोहोचणार ही भीती जगभरातील सर्वच देशांना आली होती. पण कोवीड१९ चे संकट इतके अकल्पित व अनाकलनीय रित्या पसरते आहे की बघता बघता जवळजवळ २०० देशांत याची व्याप्ती वाढली आहे. अमेरिका ब्रिटन फ्रान्स इटली असे सर्वच बलाढ्य देश आज या संकटापुढे हतबल झालेले दिसतात. जवळपास ४ महिने उलटले तरी या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध नाहीत. यामुळे या आजारावर सध्या तरी “सोशल डिस्टंसींग” हाच प्रभावी उपाय आहे. व त्या ओघाने गर्दी जमु नये म्हणून सर्व प्रथम चिनने “ला्ँकडाउन” चा पर्याय अवलंबला ज्या वूहान शहरात या आजाराचा सर्व प्रथम प्रादुर्भाव झाला व काही केल्या आटोक्यात येईना तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संपूर्ण वूहान शहर ला्ँक केले म्हणजे शहराचा ईतर भागाशी संपर्क तोडला. व हेच एक मोठे कारण आहे की कोरोना चिनच्या ईतर प्रांतात जास्त प्रमाणात नाही पसरला. परंतू सुरूवाती पासून ते ला्ँकडाउन होई पर्यंत वूहानहून मायदेशी परतलेल्या सर्व देशांच्या प्रवाशांनी करोनाचे नकळत संक्रमण केले होते. व याचा परिणाम फक्त तिन ते साडेतीन महिन्यांत बळींचा आकडा लाखांचा घरात पोहोचला आहे.
हे सर्व झाले रोगाबद्दल पण या रोगामुळे होणारे परिणाम फक्त मानवी जीवना पर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत. कारण काही अपवाद वगळता जवळपास सर्वच देशांमध्ये ला्ँकडाउन करावे लागले आहे. अमेरिकेत अर्थव्यवस्था डळमळीत होऊ नये म्हणून त्यांनी ला्ँकडाउनचा पर्याय स्वीकारला नाही परिणामी आज सर्वात जास्त कोरोनाग्रस्त अमेरिकेत आहेत व कदाचित सर्वात जास्त बळींची संख्याही लवकरच अमेरिकेची असेल. पण उर्वरित जिथे ला्ँकडाउनचा पर्याय स्वीकारला आहे तिथे सर्वत्र उद्योगधंदे बंद केले आहेत. कच्चा मालाची आयात निर्यात पुर्ण बंद आहे. कारखाने बंद झाल्यामुळे कामगार सद्यातरी बेकार झाले आहेत कंपन्या कधी चालू होतील याची काहीच शाश्र्वती नाही. कित्येक कंपन्या कायम स्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे. सर्व जगच आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडणार आहे. खूप मोठी बेकारीची कुर्हाड कामगारांवर कोसळणार आहे. यातुन कुठलाही देश सुटनार नाही.
जे जगभर चालले आहे त्याचे पडसाद भारतातही दिसायला लागले आहेत. सर्वात मोठा फटाका पर्यटण क्षेत्राला बसणार आहे. ज्या राज्याचे प्रमुख उत्पन्न पर्यटनावर अवलंबून आहे ते राज्य किंवा शहर व परिसरातील उद्योगधंदे बंद पडू शकतात. जवळजवळ एक ते दोन वर्षे पर्यटन व्यवसाय या गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही. पर्यटनाला जोडून ट्राव्हल व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. पर्यटकच नसल्याने स्थानीक दुकानदार, गाइड,हा्ँटेल अशी एक मोठी साखळी अडचणीत येण्याची शक्यता आहे. जे कामगार का्ँन्ट्राक्ट पद्धतीने काम करत आहेत त्यांना कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे. तर काही लहान मोठे उद्योग कायमचे बंद होऊ शकतात. कामगार बेकार झाले तर ब्ँकींग क्षेत्रालाही मोठा फटाका बसू शकतो. नोकरीच नाही राहीली तर घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार. कर्ज घेतलेल्या कंपन्या बंद पडल्या तर कर्जाची वसुली कुठून करणार. अशा एक दोन नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आधीच डळमळीत झालेला बांधकाम व्यावसाय कोलमडू शकतो. तेल उत्पादन कमी झाले तर महागाईचा भडका उडू शकतो. त्याचा परिणाम वाहन उत्पादनावर होऊ शकतो. केंद्र सरकार व राज्य सरकारने या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मदत जाहीर केली आहे पण त्यांचेही बजेट कोलमडणार आहे.
हे सर्व लक्षात घेऊन सर्वांनी आता पासूनच पावले उचलली पाहिजेत. अनावश्यक गरजा कमी केल्या पाहिजेत. खर्च करताना दहा वेळा विचार केला पाहिजे. ज्यांच्या नोकरी वर गदा येवू शकते त्यांनी आतापासूनच पर्याय शोधले पाहिजे. तेव्हा मित्रांनो कोरोना फक्त चिनमधे होता तेव्हा आपण त्यांच्यावर जोक करत होतो मिम्स बनवत होतो. चिनी लोकांना नावं ठेवत होतो पण आज मात्र बरोबर उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. चिन या संकटातून बाहेर पडले आहे व आपण एका खूप मोठ्या मंदीच्या सावटाखाली जगत आहोत. आज सरकारने ला्ँकडाउन घोशीत करूनही आपण घराबाहेर पडतोय कारण अजूनही प्रसंगाचे गांभिर्य लक्षात घेतले नाही काहीतरी शुल्लक कारण काढून बाहेर फिरणे टाळा. त्यामुळे तुम्ही व तुमचे कुटुंब या आजारापासून दूर राहाल. थोडे आत्मपरीक्षण करा. येणाऱ्या अवघड काळात आपण आपल्या कुटुंबासह कसे तरुन जाऊ याचा विचार करा. देव न करो पण नोकरीच गेली तर पर्याय काय याचा विचार करून ठेवावा. लाईफस्टाईल बदलावी लागेल. अनावश्यक खर्च व गरजा कमी कराव्या लागतील. सध्या घरीच बसून आहोत तर वेळ सत्कारणी लावा. मंदीमुळे आपल्या उत्पन्नात घट झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून काय करु शकतो याचा विचार करा. इंटरनेट वर फक्त फेसबुक व वाट्सअप वर टाईमपास न करता काही नवीन शिकायला मिळाले तर जरूर शिका. युट्युब वर तुम्हाला जे पाहिजे ते शिकण्यासाठी मदत होईल असे विडीओ आहेत.
तेव्हा मित्रांनो येणारा काळ अतिशय अवघड आहे बेसावध राहू नका व घाबरूनही जाऊ नका सावध मात्र नक्कीच रहा. आलेल्या संकटाला संकट म्हण्यापेक्षा संधी म्हणून पहा. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरीच रहा, कारण कोरोना स्वता फिरत नाही, पण आपण बाहेर गेलो तर तो आपल्या बरोबर घरी येवू शकतो.
माझे विचार तुम्हाला पटले तर शेअर नक्की करा