श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई

हिंदूहृदयसम्राट

आज २३ जानेवारी आदरणीय हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस साजरा करत असताना साहेबांच्या स्मृतींना उजाळा आख्खा महाराष्ट्र देत आहे. काय अशी जादू केली होती साहेबांनी की संपूर्ण जनमानसावर त्यांचे गारुड होते. हे नव्या पिढीला कदाचित ठाउक नसेल. पण आमच्या पिढीने हे अनुभवले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी, त्यांना मुंबईमध्ये ताठ मानेने उभे रहायला शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. त्याकाळी खेड्यापाड्यातुन आलेला मराठी माणूस सामान्य जिवन जगत होता. कुठेतरी कष्टाचे काम करायचे व थकून भागून संध्याकाळी घरी किंवा “गाळ्यात” येवून पाथरी टाकायची. त्याकाळी बहुतांशी मराठी बांधव मिल कामगार होते, बाकी बरेचसे लोक भाजी मंडईत व्यापार किंवा हमाली करत होते. व काही चांगले शिक्षण झालेले मराठी बांधव नोकरी पेशात होते. पण मुंबईत परप्रांतीय लोकांचेच वर्चस्व होते. नोकरीत अधिकारी पदावर बहुतांशी दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती, केरळी अशा परभाषीकांचा दबदबा होता.


या सर्वांची अरेरावी सहन करावी लागत होती
आदरणीय बाळासाहेबांना या गोष्टीची चिड येत होती. यातुनच शिवसेनेची स्थापना झाली. व बघताबघता चित्र पालटले आणि शिवसेना व बाळासाहेब मुंबईकरांच्या ह्रृदयावर राज्य करू लागले. पुढे साहेबांनी हिंदूत्वाचा एल्गार पुकारला व ऐक वेगळीच ऊर्जा निर्माण केली याचा प्रत्यय १९९२ च्या दंगलीत आला. बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यांनी खुलेआम सांगितले की जर शिवसैनिकांनी ती पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. या दंगलीच्या काळात जे हिंदू मुंबईत राहत होते ते साहेबांना या जन्मी विसरणे शक्यच नाही. व याचं मी स्वतः जिवंत उदाहरण आहे.


आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या आमच्या पिढीला महाराष्ट्राच्या राजधानीत ताठ मानेने जगायला शिकवलं अशा या महान नेत्याला त्यांच्या जन्मदिनी माझ्या कडून त्रिवार वंदन

श्री. अनंत नारायण प्रभाळे

श्री. अनंत नारायण प्रभाळे

उपाध्यक्ष:- हिंदू खाटिक समाज विकास संस्था नवीमुंबई